सांगली इस्लामपूर रस्त्यासाठी आंदोलन

Movement for Sangli Islampur Road

सांगली :  रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी दलित महासंघातर्फे आज सकाळी इस्लामपूर (Sangli Islampur Road) येथे रास्ता रोको आंदोलन (rasta roko Aandolan)केले. आंदोलनाने काही काळ वाहतूक विस्कळित झाली. महासंघाचे नेते मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

सांगली- इस्लामपूर राष्ट्रीय महामार्गाची अवस्था खूपच दयनीय आहे. पावसाने या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली. अनेकांचा रस्ते अपघातात जीव गेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी पडवळवाडी फाटा परिसरात हा महामार्ग काही काळ रोखून धरला. या महामार्गाची दुरुस्ती होणाऱ्या वाहतुकीला अनुसरून व्हावी, महामार्गाच्या दुरुस्तीमुळे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे अशा लोकांच्या वारसांना शासनाने आर्थिक भरपाई द्यावी, शिवाय ज्या यंत्रणेकडे या महामार्गाचे पालकत्व आहे, त्या यंत्रणेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या महामार्गावर अपघातात जखमी झालेल्यांना किमान दहा लाख रुपयांची भरपाई शासनाने द्यावी अशा प्रमुख मागण्या या वेळी करण्यात आल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER