कोल्हापुरात रस्त्यावरील थुंकण्याविरोधात चळवळ

Movement against street spitting in Kolhapur

कोल्हापूर : रोगराई पसरण्यासाठी थुंकण्यामुळे (spitting) बळ मिळते; म्हणूनच अशा थुंकण्याविरोधात कोल्हापूर (Kolhapur) शहरामध्ये चळवळ उभी करण्यात येत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला रस्त्यात थुंकणाऱ्या विरोधात सीसीटीव्हीच्या (CCTV) माध्यमातून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यासाठी अनेकजण आता पुढे येत असून कृती कार्यक्रमही जाहीर करण्यात येणार आहे.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून थुंकण्याविरोधात वातावरण तयार होत आहे. थुंकीतून कोरोनाचा प्रसार होत असल्याने रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जागेवरच जाब विचारण्यास अनेकांनी सुरुवात केली होती.

त्यांचे फोटोही समाजमाध्यमावर प्रसारित केले जात होते. यातूनच थुंकण्याविरोधात चळवळ ही कल्पना आता रुजू पाहत आहे.

यासाठी व्हॉट‌्स ॲप ग्रुप तयार केला असून, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यामध्ये यासाठी आता कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे. या अंतर्गत गुटखाविक्रीची माहिती देणे, रस्त्यांवर थुंकणाऱ्यांचे फोटो काढून ते प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे, शहरातील सीसीटीव्हींचा वापर करून थुंकणाऱ्यांना नोटिसा काढण्याबाबत आग्रह धरणे, मास्क नसल्याने जसा दंड होतो तसा थुंकल्याबद्दल दंड करणे, हॉटस्पॉटवर जास्त लक्ष केंद्रित करणे, शहरातील होर्डिंगवरून जनजागरण करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER