डोंगर कधीच म्हातारे होत नाहीत : राष्ट्रवादीच्या नेत्याकडून शरद पवारांविषयी भावना व्यक्त

Sharad Pawar - Hemant Takle

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (MVA) अस्तित्वात आणणाऱ्या राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्या साताऱ्यातील पावसाच्या सभेला रविवारी एक वर्ष पूर्ण होत आहे . या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते हेमंत टकले (Hemant Takle) यांनी खास पवारांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

डोंगर कधीच म्हातारे होत नाहीत…
आयुष्यभर पावसाळे खांद्यावर घेऊन ह्या अवलियाची वाटचाल सुरूच आहे. थकणं-भागणं हे शब्दच त्याला माहीत नाहीत. तारुण्याच्या उंबरठ्यावर नातं जोडलं त्यानं पाण्याशी, पावसाशी, मातीशी आणि माणसांशीही.

निसर्गानं चकवा द्यावा, पावसानं फसवावं, कधी धुवाधार बरसात, तर कधी गायब व्हावं…

हा खेळ त्यानं केव्हाच हेरला होता आणि मग सुरू झाला एक संघर्ष बळीराजासाठी… असे टकले म्हणाले आहेत .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER