मोतीलाल वोरा यांची कमतरता नेहमी जाणवेल; राहुल गांधी यांची श्रद्धांजली

दिल्ली : मोतीलाल वोरा हे खरे काँग्रेसी होते. त्यांची कमतरता नेहमी जाणवेल. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहेत, या शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा (Motilal Vora) यांना श्रद्धांजली अर्पण केली.

मोतीलाल वोरा (९३) यांचे आज (सोमवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. काल (रविवारी) त्यांचा जन्मदिवस होता. दोन दिवस आधी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यापूर्वी त्यांना कोरोना  झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार झाले व ते बरे होऊन घरी परतले होते. मोतीलाल वोरा अनेक वर्षे काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. काही काळ ते उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER