रितेशच्या कुर्त्याला आईची माया

Ritesh Deshmukh

आपल्या प्रत्येकाचे आयुष्य वेगवेगळे असले, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वाटा वळणे जरी वेगळी असली तरी अशा काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सारख्याच असतात. त्या पैकीच एक म्हणजे आईची माया….लहानपणी आपल्याला आईच्या साडीची

गोधडी हवी असायची. अनेकदा मुलं कितीही मोठी झाली तरी आईच्या साडी पासून बनवलेली गोधडी जपून ठेवायचे. आतादेखील अभिनेता रितेश देशमुख याने दिवाळीदिवशी जो निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता तो कुठल्या शोरूम मधून विकत आणला नव्हता किंवा कुठल्या किंवा कुठल्या स्पेशल डिझायनर कडून तयार करून घेतला नव्हता तर आईच्या साडीपासून त्याने अगदी आपल्या नेहमीच्या टेलर कडून शिवून घेतला होता. याच साडीपासून रितेशने त्याच्या दोन्ही मुलांना देखील कुर्ते शिवून घेतले आणि एकाच रंगाच्या या कुर्त्यामध्ये रितेशने दोन मुलांसह त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. लाखो रुपये खर्च करून देखील असा करता आणि त्यामध्ये असलेल्या आईच्या साडीची म उब मिळणार नाही असं सांगत रितेशने या दिवाळीच्या ड्रेसचे खास वर्णन केले आहे.

अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी दिवाळीचे फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना वेगवेगळ्या प्रकारे भेट दिली आहे. अभिनेता रितेश देशमुख याच्या चाहत्यांना त्याने पाठवलेल्या दिवाळीचा फोटो किती खास आहे याची पहिल्यांदा कल्पना आली नाही. मात्र फोटोसोबत लिहिलेली ओळ आणि या फोटोसोबत त्यांनी अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये आईच्या हातामध्ये तीच साडी दिसत आहे त्या साडीचा नंतर कुर्ता बनला आहे.

रितेशच्या शब्दात सांगायचं झालं तर, आकाशी रंगाची थोडीशी चमक असलेली ही साडी आई नेहमी नेसायची. या साडी मध्ये आई खरच खूप सुंदर दिसायची. बाबांनी तिला ही साडी भेट दिली होती. त्यामुळे तिने खूप वर्ष ही साडी जपून ठेवली होती. मला आठवतय, जेव्हा जेव्हा काही सण-उत्सव असायचे किंवा खास दिवस असायचा जो आईसाठी खूप महत्त्वाचा आहे त्या दिवशी आई ही आकाशी रंगाची साडी नेसायची. ही साडी खूप जुनी आहे मात्र तिच्यासाठी ते जुनेपण अजिबात कमी झालेले नव्हते. काही दिवसांपूर्वी या विषयी अनेक आठवणी निघाल्या तेव्हा आई म्हणाली की ही साडी जरी मी आता नेसत नसले तरी मला ही साडी आपल्या घरात अजून काही दिवस राहावी असं वाटत आहे. आणि मग त्यातूनच असे ठरले की या साडीचा कुर्ता शिवायचा. आकाशी रंग हा माझ्या खूप आवडीचा असल्यामुळे माझ्यासाठी आणि माझ्या दोन्ही मुलांसाठी आईच्या साडीपासून मी कुर्ते शिवले.

दिवाळी म्हटलं की नवीन ड्रेस हे समीकरण आलच. रितेश हा हिंदी आणि मराठी सिनेमातील मोठा कलाकार आहे. कुठल्याही मोठ्या शोरूम मध्ये जाऊन हजारो रुपयांचा ड्रेस विकत घेणे त्याच्यासाठी सहज सोपे आहे. एखाद्या डिझायनर कडून ड्रेस डिझाईन करून घेणे हेदेखील रितेशला अवघड नाही. मात्र यंदाच्या दिवाळी साठी रितेशला आईच्या साडीपासून शिवलेला कुर्ता परिधान करत त्या लाखो करोडो रुपयांच्या ड्रेसला लाजवेल आनंद झाला आहे. रितेशने केवळ स्वतःलाच नव्हे तर त्याच्या दोन्ही मुलांना देखील त्याच्या आज्जीच्या साडी पासून बनवलेले कुर्ते शिवून घेतले आहेत. यापूर्वी देखील आपण सोशल मीडिया पेजवर पाहिले आहे की त्याने त्याच्या सारखे ड्रेस त्याच्या दोन्ही मुलांना शिवून घेतले होते आणि असे अनेक फोटो तो सतत शेअर करत असतो.

दसऱ्यात देखील आपल्या दोन्ही मुलांसोबत नवरात्रीची पूजा करत असताना चा व्हिडिओ आणि मंत्रपुष्पांजली तसेच गायत्री मंत्र म्हणत असताना चा फोटो शेअर केला होता. घरातल्या मराठी संस्कृतीची परंपरा नेहमीच तो आपल्या मुलांना सांगत असतो. रितेशने या दिवाळीला आईच्या साडी पासून बनवलेल्या ड्रेस स्वतः आणि मुलांना शिवला तेव्हा त्याच्या मुलांनी देखील खरं तर हा प्रश्न विचारला होता की आपण साडीपासून नवीन कर्ते का शिवले? तेव्हा त्याने दोन्ही मुलांना, आईची साडी, तिचं महत्त्व, त्याची उब, आईची माया, प्रेम या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मुलांना देखील या गोष्टीचे खूप नवल वाटलं आणि म्हणूनच घरातल्या जुन्या साडीचे असे नवे ड्रेस शिवून घालण्यातला आनंद रितेश आणि त्याच्या मुलांच्या चेहऱ्यावर देखील ओसंडून वाहत असल्याचे फोटोमध्ये दिसतय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER