आई-बहिणींना मंगळसूत्र गहाण ठेवावं लागत, राज्यकर्त्यांना लाज वाटायला हवी – प्रवीण दरेकर

Praveen Darekar

बुलडाणा :- जोपर्यंत 11 हजार रुपये देत नाही तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज देणार नाही, अशी तंबी रूग्णालयाकडून देण्यात आली. त्यानंतर संपूर्ण बिल भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने थेट रुग्णाच्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून घेतल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यातील खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात घडली होती. या घटनेवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत राज्यकर्त्यांना सुनावले.

आपल्या आई-बहिणींना सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागत असेल, तर राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे” अशा शब्दात दरेकर यांनी संताप व्यक्त केला. बुलडाणा दौऱ्यावर असलेल्या प्रवीण दरेकर यांना पत्रकारांनी या घटनेवरुन प्रश्न विचारला, त्यावर उत्तर देताना दरेकर म्हणाले की, खासगी कोव्हिड रुग्णलयाचे बिल तपासण्यासाठी ऑडिटरच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पण काय साध्य झाले? सरकार फक्त योजनांची घोषणाबाजी करण्यातच समाधान मानत आहे. मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे. आपल्या आई-बहिणींना सौभाग्याचं लेणं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागत असेल, तर राज्यकर्त्यांना लाज वाटायला हवी, अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी संताप व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button