माता न तू वैरिणी! तीन महिन्यांच्या बाळाला बेवारस ठेवून महिलेचा पळ

तीन महिन्यांच्या बाळाला बेवारस ठेवून महिलेचा पळ

बुलढाणा : एका महिलेने आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला मध्यरात्री अगदी गोठवणाऱ्या थंडीत बेवारस सोडून पळ काढला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेने या महिलेचा तीन तासांत शोध घेत बेवारस बाळाला आई मिळवून दिली. माहितीनुसार , मेहकर तालुक्यातील डोनगाव पोलिसांच्या हद्दीतील पांगरखेड गावात एका घरासमोर संबंधित महिला आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला सोडून गेली. ही बाब सकाळी लक्षात आल्यावर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतलं आणि तपास सुरू केला.

पुण्यात कामाला असलेलं आणि प्रेमविवाह केलेलं दाम्पत्य आपल्या गावी जात असताना, रस्त्यात दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यामुळे बाळ बेवारस सोडल्याचे महिलेने सांगितले . पोलिसांनी या बाळाची आई सुवर्णा आणि वडील पवन टाकतोडे यांना केवळ तीन तासांत शोधून त्यांच्याकडे बाळ सोपवले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER