मुलाच्या मतदारसंघाला प्रथम आणण्यासाठी सुनंदा पवार कर्जत-जामखेडच्या मैदानात

Sunanda Pawar - Rohit Pawar

अहमदनगर : स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या स्पर्धेत आपल्या मुलाच्या मतदारसंघाला अव्वल स्थान मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे (NCP) युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या मातोश्री सुनंदा पवार (Sunanda Pawar) खुद्द मैदानात उतरल्या आहेत. सध्या कर्जत आणि जामखेड शहराने स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आपल्या मुलाच्या मतदारसंघाचा प्रथम क्रमांक यावा, यासाठी स्वतः सुनंदा पवार यांनी कंबर कसली आहे.

अहमदनगरमधील कर्जत शहर स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात उतरलं आहे. यात चक्क आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सहभाग नोंदवला आहे. या स्वच्छता अभियानात दोन्ही शहरं तयारीला लागली आहेत. त्या सध्या कर्जत आणि जामखेडच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांसोबत एकजुटीने काम करत आहेत. मी यात प्रबोधनाचे काम करत असल्याचं सुनंदा पवार यांनी सांगितलं. आतापर्यंत शंभरहून अधिक बैठका आणि कॉर्नर सभा झाल्या आहेत. ज्या काही समस्या आहेत त्या रोहित यांच्या माध्यमातून दूर होतील, असा विश्वास सुनंदा पवारांनी व्यक्त केला. गेल्या वर्षीचं प्रगतिपुस्तक हे फारसं समाधानकारक नाही. त्यावर लाल रिमार्क खूप आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षेला बसून ते रिमार्क क्लिअर करणं याचं मोठं आव्हान आमच्यासमोर असल्याचं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER