जगातील सर्वांत मोठ्या ‘मोटेरा स्टेडियम’चे नरेंद्र मोदी नाव; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

अहमदाबाद : जगातील सर्वात मोठ्या ‘मोटेरा’ क्रिकेट स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या नावाच्या कोनशिलेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल आदी उपस्थित होते. भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरी टेस्ट मॅच याच मैदानावर खेळली जाणार आहे.

जगातील सर्वांत मोठे स्टेडियम
‘मोटेरा स्टेडियम’ हे जगातील सर्वांत मोठे स्टेडियम म्हणून ओळखले जाते. भारत आणि इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा पुनर्बांधणी केलेल्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असल्याने दुपारी २.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.हे नवीन मोटेरा स्टेडियम ६३ एकर जागेत बनले आहे. या स्टेडिअमला तीन प्रवेशद्वार आहेत. तसेच याची आसन क्षमता १ लाख १० हजार इतकी आहे. या स्टेडियममध्ये ७६ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यातील प्रत्येक बॉक्समध्ये २५ जणांची आसन क्षमता आहे. तसेच ५५ खोल्या असलेले क्लब हाऊसदेखील आहे. तसेच त्यात एक जिम आणि ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूलसुद्धा आहे. त्याचबरोबर यात तीन प्रॅक्टीस ग्राउंड, एक इनडोअर क्रिकेट ऍकेडमीचीही सुविधा आहे.

भारतातील दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना
भारतातील हा दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी कोलकाताच्या ‘इडन गार्डन’ या स्टेडियमवर पहिल्यांदा भारत विरुद्ध बांगलादेश संघात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता. तर मोटेरा स्टेडियममध्ये हा तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ‘ऍडलेड’ येथेदेखील दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. तर इंग्लंड संघाचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असेल.

चौथा सामनाही मोटेरा स्टेडियमवर
भारत आणि इंग्लंड संघात होणारा चौथा आणि कसोटी मालिकेतील शेवटचा सामना ‘मोटेरा स्टेडियम’वरच होणार आहे. हा सामना सर्वसामन्यासारखाच आहे. मागील वर्षी २४ फेब्रुवारी २०२० ला अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मोटेरा स्टेडियमला भेट दिली.

मोटेरा स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अलीचे सामने
काही दिवसांपूर्वी या स्टेडियमवर भारतातील देशांतर्गत स्पर्धा सय्य्द मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीच्या बाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याच स्टेडियमवर तमिळनाडूने बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER