लोकसभा निवडणूक : बहुतांश वंशवादी राजकाणातील चेह-यांनी गाशा गुंडाळला

Dynastic politician faces

नवी दिल्ली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जात हा निकष मागे पडला असून विरोधी पक्षातील राजकीय वंशवळीलाही चांगलाच धक्का बसला असून ते जनादेश मिळवण्यास अयशस्वी ठरले आहे. मग ते उत्तर प्रदेशातील मुलायमसिंग यादव असो किंवा बिहारमधील लालू प्रसाद यांचे कुटुंब, हरयाणातील हूड्डा किंवा महराष्ट्रातील शरद पवार कुटुंब त्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हूड्डा याचे कुटुंबातील तसेच काँग्रेस नेते दीपेंदर सिंग हुड्डा हे रोहतकमध्ये मागे होते तर त्यांच्या पित्याचा सोनीपतमधून पराभव झाला.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकरांच्या पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीकडून सारवासारव?

हरियाणातील हिस्सारच्या वंशपरंपरेतील लढाईत भाजप उमेदवार व माजी केंद्रीय मंत्री बिरेंदर सिंग यांचे चिरंजीव ब्रिजेंद्र सिंग पराभूत झाले. माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे नातू दुष्यंत चौटाला तसेच माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे तिसरी पिढी भव्य बिश्नोई हे सुद्धा पराभूत झाले.

उत्तर प्रदेशात राष्ट्रीय जनता दलाचे नेते अजित सिंग आणि त्यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांचासुद्धा पराभव झाला. एवढेच नव्हे तर यादव कुटुंबातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव कनौजमधून मागे होत्या. बदौन येथून मुलायमसिंग याचे पुतणे धर्मेंद्र यादव आणि आणखी एक पुतणे अक्षय यादव फिरोजाबाद येथून पिछाडीवर होते.

मात्र मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव आघाडीवर होते.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेब विखेंच्या नातवावर गुलाल ; पवारांच्या नातवाबद्दल बोलायचं नाही : राधाकृष्ण विखे

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे चिरंजीव जतीन प्रसाद हे उत्तर प्रदेशातील धौराहा येथून तिस-या क्रमांकावर होते. तर मध्यप्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते मधावराव सिंधिया यांचे पुत्र जोत्यिरादित्य सिंधिया यांनी गुना येथील जागा गमावली. हा त्यांचा दुहेरी पराभव आहे. कारण सिंधिया पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी होते. जिथे काँग्रेसला मोठा पराभवाचा सामना करावा लागला.

दक्षिण मुंबईतून काँग्रेसने नेते मुरली देवरा यांचे चिरंजीव मिलिंद देवरा पराभूत झाले. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव जोधपूर येथून पराभूत झाले. परंतू वसुंधरा राजे यांचे चिरंजीव दुष्यंत सिंह झालवार-बारान येथून विजयी झाले. तथापि, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांचे पुत्र नकुल छिंदवाडा येथून विजयी झाले. या जागेवर कमलनाथ सातत्याने विवडून येत आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामती मतदार संघातून तिस-यांदा विजयी झाल्या. परंतू त्यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळ मतदार संघातून पराभूत झाले. बिहारमधून राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मिशा भारती मागे होत्या.

तत्कालीन शिरोमणई अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल आणि त्यांच्या पत्नी हरसिमरन कौर बादल फिरोजापुर आणि भटिंडा येथून क्रमश: विजयी झाल्या तर तामिळनाडूतील डीएमकेचे संस्थापक एम करूणानिधी यांच्या कन्या के कनिमोझी थूथूकुड्डी येथून आघाडीवर होत्या.

तेलंगना येथून मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविथा कल्वकुंतला निझामाबाद पराभूत झाल्या. कर्नाटकमधून माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातेू प्रज्जल रेवन्ना हासन येथून पराभूत झाले. परंतू त्यांचे आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचे चिरंजीव निखील कुमारस्वामी मांड्या येथून पराभूत झाले. तर देवेगौडा तुमकुर मतदार संघातून पराभूत झाले.