डासांचा उच्छाद ? शहरे स्वच्छ ठेवणे हे नागरिकांचेही कर्तव्य!

केरळ हायकोर्ट: केवळ हक्क न सांगता जबाबदारीही पाळा

Mosquito infestation

कोची :- शहरांमध्ये डासांनी उच्छाद मांडल्यावर त्याचा बंदोबस्त करणे ही केवळ महापलिका आणि नगरपालिकांचीच जबाबदारी नाही. त्यासाठी नागरिकांनाही शहरांमधील नाले, गटारे व सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची खबरदारी घ्यायला हवी, असा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

हा निकाल देताना मुख्य न्यायाधीश न्या. एस. मणिकुमार आणि न्या. शाजी पी. चाली यांनी हा निकाल देताना म्हटले की, शहरांत जेव्हा अस्वच्छता व तुंबलेल्या पाण्यामुळे डास होतात तेव्हा महापालिकेने उपाय योजावेत, अशी ेपेक्षा ठेवून नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी संपत नाही. हा त्रास कोणा एकास नव्हे तर सर्वांनाच होत असल्याने आपले शहर अस्वच्छ राहून डासांची पैदास होण्यास प्रोत्साहन मिळेल अशी परिस्थिती न निर्माण होऊ न देणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.  केवळ आपल्यापुरता विचार न करता इतरांचाही विचार करून त्यानुसार प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक कर्तव्य पाळायला हवे.

के. आर. रणजीत नावाच्या थिरुवनंतपूरम येथील नागरिकाने केलेली जनहित याचिका निकाली काढताना न्यायालयाने हा निकाल दिला. विषेष म्हणजे ही याचिका गेली सात वर्षे प्रलंबित होती. आरोग्यदायी वातारणात जगणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. परंतु शहरांमध्ये डासांची अतोनात उपद्रव होऊनही महापालिका आणि नगरपालिका काहीच करत नसल्याने या हक्काची पायमल्ली होत आहे. तरी महापालिकांना यावर उपाय योजण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची विनंती होती.

न्यायालयाने नोटिस काढल्यावर थिरुवनंतपूरम आणि कोची महापालिकांनी डासांच्या प्रतिबंधासाठी त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या उपायांची माहिती देणारी प्रतिज्ञापत्रे केली. त्यातील उणिवा व त्रुटी दूर करून या योजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. मात्र हे करत असतानाच वरीलप्रमाणे नागरिकांनाही त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देत न्यायालयाने म्हटले की, नागरिकांनी त्यांच्या सामाजिक जबाबदाºया  पार पाडल्या नाहीत तर महापालिकांनी कितीही उपाय योजले तरी त्यांचा इच्छित परिणाम होणार नाही..

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER