मॉर्फ फोटो : हा चित्रा वाघ यांना बदनाम करण्याचा प्रयत्न, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर आरोप

Sudhir Mungantiwar - Chitra Wagh - Uddhav Thackeray

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. भाजपाच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी यावरून सरकार आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्या वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेत त्या थेट आरोप करत आहेत. यानंतर काही समाजकंटकांनी चित्र वाघ यांचे राठोडांसोबत त्यांचेच मॉर्फ केलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकलेत. यावरून माजी मंत्री व भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उद्धव सरकारवर आरोप केले आहे की, सरकार त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे.

पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणालेत की, चित्राताई वाघ पूजा चव्हाणला न्याय मिळावा म्हणून आवाज उचलत आहेत, म्हणून सरकार त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना अशा प्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. पोलीसांनी याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

…त्यांना आपण सोन्याची अंगठी दोतो तेव्हा संशय निर्माण होतो –

ज्यांच्यासोबत आपण फोटो काढला, त्यांच्यासोबत आपण संभाषण करतो. त्यांना सोन्याची अंगठी देतो, पितळेची नाही, तांब्याची नाही, तेव्हा संशय निर्माण होतो. हा संशय चौकशीतून दूर करायला हवा. त्यामुळे चौकशी होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे ते म्हणालेत.

ठाकरे सरकारला समजावली शिवशाही
मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारला शिवशाहीही म्हणजे काय, हे सांगिलते. म्हणालेत, छत्रपती शिवजी महाराजांचा आम्ही मंत्रालयात फटो लावतो अथवा शिवरायांचे दर्शन घेऊन विधानभवनात प्रवेश करतो, ते यासाठी की महाराजांना आम्ही विश्वास देतो – तुमच्या या रयतेच्या राज्यात तुम्ही जरी आमच्यात नसले, तरी तुमचा विचार आम्हाला दिशा देतो. कोणत्याही महिलेवर अन्यात, अनाचार झाला, तर रांझ्याच्या पाटलाची जी दशा झाली, तीच आम्ही तुमच्या या रयतेच्या राज्यात केल्याशिवाय राहणार नाही, ही भावना त्यामागे असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER