पहाटेची शपथ : पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची; भाजपाची टीका

Sharad Pawar - Atul Bhatkhalkar

मुंबई :  गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात घडलेल्या सत्तानाट्यावर आधारित ‘पॉवर ट्रेडिंग’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. या पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऐनवेळी भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलल्याचा उल्लेख आहे. यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली – पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची. (BJP leader Atul Bhatkhalkar on Power trading book) गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना भातखळकर म्हणाले – देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सगळा वृत्तांत सांगितला आहे.

शरद पवार यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाच्या सोबत येण्याचे मान्य केले होते. काळाच्या ओघात सर्व घटना उघड होतील. ‘पॉवर ट्रेडिंग’ पुस्तकाच्या लेखिका प्रियम गांधी यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांचा खुलासा केला. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला भाजपाला पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यासाठी राष्ट्रवादीतील एका माजी केंद्रीय नेत्यातर्फे भाजपाशी बोलणी सुरू होती. अमित शहा  यांच्या निवासस्थानी शहा, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी एक बैठक नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला पार पडली. मात्र, त्यानंतर शरद पवार यांनी अचानक आपली भूमिका बदलली, असे प्रियम गांधी यांनी सांगितले.

इंदिरा गांधींचे ऐकले नाही; तुम्ही कोण आहात?

‘संजय राऊत यांनी आम्हाला दम दिला. त्यांना आम्हाला सांगायचे आहे की, अशी  दमबिम देण्याची भाषा करू नका. ही भाजपा आहे. आम्ही इंदिरा गांधींचे ऐकले नाही, तुम्ही कोण आहात? सर्व राज्य एका कुटुंबासाठी चालवले जाते आहे. तुम्ही कितीही दबाव आणला तरी ही भाजपा जनतेचा आवाज बुलंद करेल.’ असा इशारा भातखळकरांनी दिला. ‘महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी दमबाजीची भाषा करतात.

आम्ही तुमच्या अंगावर येऊ, तुम्हालाही मुलंबाळं आहेत, असे मुख्यमंत्री म्हणतात. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, आज संविधान दिवस आहे. कायद्याचे राज्य आहे, त्यांचे नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा करणे गैर तर आहेच; पण १०० टक्के घटनाविरोधी आहे.’ असे भातखळकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER