केंद्राने सर्वाधिक लसी पुरवल्यामुळे राज्यात जास्त लसीकरण; देवेंद्र फडणवीसांचा दावा

Devendra Fadnavis - Maharastra Today

अमरावती :- आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीच सांगितले की, देशात सर्वांत जास्त लसीकरण हे महाराष्ट्राने केले आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने  मोठ्या प्रमाणात लसी  दिल्या म्हणूनच हे करता आले आहे, असा दावा भाजपचे (BJP) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावेळी ते अमरावतीच्या दौऱ्यावर होते.

देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील कोविड रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लसीकरणाच्या मुद्यावर भूमिका मांडली. “आपण लस ही तयार केली म्हणून ठीक आहे. जर परदेशातून मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती? पण, केंद्राने सर्वाधिक लसींचा पुरवठा केल्यामुळे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे.” असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

“पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट कोरोना लस तयार करत आहे. पण लस बनविण्यासाठी कच्चा माल हा अमेरिकेतून यायचा, पण तो बंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बोलल्यानंतर आता अमेरिका कच्चा माल पाठवत आहे. मात्र, आता उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल.” असे फडणवीस यांनी सांगितले.

लसींचे नियोजन केले
दरम्यान, १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना खाजगी रुग्णालयात लसीकरण करावे लागेल, असा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. मात्र, घेतलेला निर्णय योग्य ठरणार नाही. लसीकरण करताना लसींचा पुरवठा किती होतो आहे, याचा विचार करून नियोजन करावे लागते. एका दिवसात सर्व लसी तयार होत नाहीत, अशी सूचनाही फडणवीस यांनी यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.

ही बातमी पण वाचा : ‘आता तरी केंद्राने महाराष्ट्राच्या रोल मॉडेलची दखल घ्यावी’, संजय राऊतांचा सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button