अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत एकाच व्यासपीठावर येणे टाळले

Devendra Fadnavis - Ajit Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दीड वर्षापूर्वी पहाटेचा शपथविधी घेऊन सर्वांचा धक्का दिला होता . मात्र त्या नंतर त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले. पण, राज्यात कोरोनाची (Corona) परिस्थितीत चिंताजनक होत असल्यामुळे अजित पवारांनी 50 पेक्षा जास्त लोकं असलेल्या कार्यक्रमास जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फडणवीस आणि अजितदादा आज पुण्यात (Pune) एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता मावळली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांना निर्बंध घालण्यात आले आहे. अशातच अजित पवारांनीही याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला .

ज्या कार्यक्रमाला पन्नास पेक्षा अधिक लोक जमा होणार असतील तर त्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहणार नाही’, असा निर्णय उपमुख्यम॔त्री अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे पुण्यात आज अभिनेते प्रशांत दामले यांच्या कार्यक्रमास अजित पवार उपस्थित राहणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER