राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती, भाजपचे आमदार नाराज; जयंत पाटील यांचे मोठे संकेत

Jayant Patil

मुंबईः भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, असे मोठे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)यांनी दिले. मुंबईत जयंत पाटील यांनी बोलताना राष्ट्रवादीत मेगाभरती होणार असल्याचे ते म्हणाले. .

गेल्या काही दिवसांपासून अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भाजपामध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.

बुधवारी कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम त्वरित थांबवण्यात यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. याबाबत जयंत पाटील म्हणाले, स्टे दिलेला असला तरी अंतिम सुनावणी बाकी आहे. आरेच्या भागात वन क्षेत्र आहे, त्यात वनविरोधी जे लोक आहेत, त्यांना उकळ्या फुटायची गरज नाही. मुंबईच्या जवळ वन असणे हे मुंबईकरांसाठी भाग्याचे आहे. तिथे प्रकल्प केले तर पर्यावरण हानी होते, सरकारने भूमिका घेतली त्यावर इतकं आकांततांडव करण्याची गरज नाही. राजकीय हितासाठी काही जण राजकारण करत आहेत, असंही जयंत पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी केंद्राकडून शेतकऱ्यांना उशिरा मदत मिळत असल्याच्या मुद्द्यावरूनही टीका केली. दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाली. केंद्र सरकारकडे आम्ही सतत मागणी केली असून, केंद्रानं पथक पाठवायला हवे. आता संकट सावरल्यावर तब्बल दोन महिन्यांनी टीम येते म्हणजे केंद्राचा राज्यांकडे पाहण्याचा दुजाभाव बदलला आहे. संकट आल्यावर पवार साहेब केंद्रीय मंत्री असताना लगेच टीम यायची, राज्याला मदत मिळायची. आज मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते, विशेषतः महाराष्ट्राबाबत दुजाभाव करत आहेत, असंही जयंत पाटलांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER