उन्हाच्या चटक्यांमध्ये २५ टक्के वाढ!

direct sun, depleting levels of soil moisture increased frequency of hot days

पुणे :- काय ऊन तापले आहे! किती हे ऊन! ही वाक्ये उन्हाळ्यात नेहमीच कानावर येतात. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ हा शब्दही सतत माध्यमांमध्ये येत असतो. या सार्‍या पृष्ठभूमीवर, पर्यावरणाबाबत काहीशी दचकविणारी बातमी आहे. उन्हामुळे लागणार्‍या चटक्यांमध्ये सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे!

याचे कारणही तसेच आहे. तप्त अर्थात उष्ण दिवसांची तीव्रता २४.७ टक्क्यांनी वाढली आहे. भारतातील तप्त दिवसांची सरासरी तीव्रता एका अभ्यासात नोंदविण्यात आली. त्यावरून हा निष्कर्ष काढता येतो.

चण्याचे उत्पादन वाढले, पण भाव मिळेना; आयातीचा धसका

या अभ्यासात १९५१ सालापासूनच्या तापमानविषयक ‘डाटा’चे विश्लेषण करण्यात आले. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक असल्याचेही आढळून आले आहे. या अभ्यासात १९५१ ते २०१८ या कालावधीमधील भारतातील ३९५ ठिकाणांच्या तापमानाचा अभ्यास करण्यात आला.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेऑरॉलॉजी आणि इटलीतील अब्दुस सलाम इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरॉटिकल फिजिक्स आणि सौदी अरेबियातील किंग अब्दुल अझीज विद्यापीठातर्फे ही अभ्यास-मोहीम संयुक्तपणे राबविण्यात आली.