भांडेवाडी डम्पिंग यार्ड हटविण्याच्या मागणीसाठी पालिकेच्या सभेवर मोर्चा

File Pic

नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील रहिवाश्याना येथील डम्पिग यार्डची मोठी समस्या आहे. या कचराघरामुळे पसरलेली दुर्गंधी, जाळलेल्या कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लगाताहेत. वर्षा मागून वर्षे गेली, मोर्चांवर मोर्चे काढले, निवेदने सोपली, मंत्र्यांना घेराव घातले, प्रशासनाला विनवणी केल्या, उपायोजनेचे साकडे घातले परंतु यांनतरही कुठलाही तोडगा न निघाल्याने भांडेवाडी परिसरातील नागरिकांनी जोरदार नारेबाजीकरत महापालिकेच्या आम सभेवर धडक दिली अन् थेट उपाय काय करता याची विचारणा केली.

या डम्पिग यार्डमध्ये शहरातील गोळा केलेला कचरा जमा केला जातो. कनक रिसोर्सेसचे कर्मचारी घरोघरी जाऊन कचऱ्याची उचलकरून याठीकाणी जाम केला जातो. येथे कचऱ्यावर प्रक्रिया (ट्रिटमेंट) करणाऱ्या हंजर कंपनीचा प्लांट बंद असल्यामुळे कचऱ्यांचे ढिगारे चढले आहेत. वाढत्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण इतके आहे की, रस्त्यावररून जाणाऱ्या व्यक्तीच्याही सहणशिलतेपलिकडे असते. कचरा जाळल्यामुळे त्यातून निघणारा धुर रोगांचे कारण बणत आहे. अशी नरकयातना भांडेवाडीवासी वर्षो नू वर्षे सहण करत आहे. अलिकडे गेल्या १५ दिवसापासून विना परवानगी डम्पिग यार्डातील कचरा जाळल्या जात आहे. त्याचा सर्वसामांन्याचा जीवनावर विपरित परिणाम होत आहे. याठिकाणी असामाजिक तत्वांचा जमावडा नित्याचीच बाब आहे. त्यानंतरही सुरक्षा रक्षकांचा येथे अभाव आहे.

परिणामी, येथील डम्पिग यार्ड हटविण्यात यावे, तोवर ठोस उपायोजना याठिकाणी करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी आयुक्तांना केली. काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वात नागरिकांनी आयुक्तांचा घेराव केला. त्यावर बोलतांना आयुक्तांनी पालिकेची बाजु मांडताना सांगितले की, काही असामाजिक तत्व मेटलच्या शोधात डम्पिग यार्ड कडे आगेकूच करतात. कचरा जाळला की मेटल वर येत असल्याने कचरा जाळण्याच्या घटना नियमित होत आहे. कचरा जाळल्यानंतर धुर हा काचऱ्या खाली दाबल्या जात असल्याने आग लागण्याच्या शक्यतेपोटी त्यावर पाण्याचा शिडकाव केल्यास धूर उडण्याची शक्यता बळावते. परिणामी, माती टाकून आग विझविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांची संख्या ३ वरून १५ वर करण्यात येणार आहे. सुरक्षा रक्षकांवरच अवलंबुन न राहता पोलिसांची गरज घेतील जाणार आहे. कारण, असामाजिक तत्व हे शस्त्रनिशी असतात शिवाय त्यांची संख्या अधिक असते. यासर्व उपायोजांसह महिन्याभरातच संपूर्ण उपायोजना करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नागरिकांना सांगितले.