
परभणी :- दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता अक्षरशः त्रासून गेली आहे. ही दरवाढ कमी करण्याऐवजी उलट वाढतच आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे कंटाळलेल्या जनतेसाठी परभणीतील शिवसेना रस्त्यावर उतरली. या दरवाढीचा शिवसेनेने तीव्र निषेध केला.
कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला. एकंदरीत सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. लवकरच पेट्रोल व डिझेलचे भाव शंभरी ओलांडतील आणि त्यामुळे आणखी महागाई वाढेल. या चिंतेने माणसाला ग्रासले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे देशभर प्रचंड नाराजी पसरली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या भावना सरकारला कळाव्या, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे यांच्यासह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नांवदर, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला