मायक्रो फायनान्सच्या विरोधात कोल्हापुरात मोर्चा : सोशल डिस्टंसिंग फज्जा

मायक्रो फायनान्सच्या विरोधात कोल्हापुरात मोर्चा

कोल्हापूर : मायक्रो फायनान्स (Micro Finance) कंपन्यांकडून थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सुरू असलेल्या विरोधात मंगळवारी महिलांनी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. मोर्चात सुमारे 500 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या कोरोना संसर्गाची भीती असूनही कसलेही सोशल डिस्टंसिंग यावेळेला पाळले गेले नाही.

करो या मरो या भूमिकेत असलेल्या या महिलांनी पाऊस आणि कोरोनाचीही पर्वा केली नाही. छत्रपती शासन महिला आघाडीच्या दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली दुपारी हा मोर्चा निघाला. स्टेशन रोड ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा निघालेल्या या मोर्चात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

वसुलीचा तगादा लावणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर फोजदारी कारवाई करा, वसुलीला पूर्ण पणे स्थगिती देऊन कर्जेही कायमची माफ करा, महिलांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, आदी मागण्या या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे करण्यात आल्या.

कोरोनामुळे (Corona) एकत्र येण्यास बंदी असतानाही मोर्चा निघाला, यात तोंडाला मास्क वगळता कोणतीही खबरदारी घेतली गेली नव्हती. मोर्चा एकत्र चालताना आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारून बसताना ही सोशल डिस्टन्स पुरा फज्जा उडाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER