कोरोना व्हायरसचा फटका : भारताचा 2020 चा जीडीपी 2.5 टक्के : मूडीचा अंदाज

Moody's

नवी दिल्ली : इन्व्हेस्टर सर्व्हिसेस मूडीने 2020 या वर्षातील भारताचा अनुमानीत सकल घरघुती उत्पादनाचा विकास दर (जीडीपी) 2.5 दर्शविला आहे. हा दर यापूर्वीच्या 5.3 टक्के अनुमानीत दरावरून खाली आला आहे. कोरोना व्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर अनपेक्षित परिणाम झाला आहे.

रिझर्व बँकेकडून भारतीयांना दिलासा

2020-21 जागतिक लघु सर्व्हेत मूडीने म्हटले आहे की भारतातील सर्वच प्रकारच्या मिळतीत मोठ्या प्रमाणात पडझड होणार असून विकास दर 2.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. स्थानिक मागणी आणि 2021 मध्ये वसुलीवर बरेच काही अवलंबून राही.

बँक आणि गैर बँकिंग क्षेत्रातील लिक्विडीटीवरीव ताणामु‍ळे भारताच्या अर्थव्यवस्थेतील पत पुरवठ्यावर आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान प्रभावीत झाला असल्याचे म्हटले आहे.

लॉकडाऊनमुळे व्यावार तसेच फॅक्टरी व रोजंदारी मजूर हजारोंच्या संख्येने बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे विमानसेवा, रेल्वसेवा तसेच बससेवा बंद झालेल्या आहेत. कोरोनाव्हायरसचे जगात 24000 वर बळी गेलेले आहेत तर भारतात कोरोनाव्हायरसचे रुग्ण 700 च्या वर झाले आहेत.