सर्वोत्कृष्ट यादीत ‘मोदी’ आणि ‘योगी’ प्रथम; उद्धव ठाकरे पहिल्या ‘दहा’त

Uddhav Thackeray-Yogi Adityanath-PM Modi

नवी दिल्ली :- ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ (Mood of The Nation 2020)ने केलेल्या सर्वेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) तिस-यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत.

योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक एकूण २४ टक्के मतं मिळाली आहेत. गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ही मतं सहा टक्क्यांनी वाढली आहेत.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रधानमंत्री ठरले आहेत. ४४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं मत नोंदवलं आहे. दुसऱ्या क्रमांकावर अटलबिहारी वाजपेयी यांचा समावेश असून त्यांना १४ टक्के मतं मिळाली आहेत. तिसऱ्या क्रमांकावर १२ टक्क्यांसहित इंदिरा गांधी आहेत. जवाहरलाल नेहरु आणि मनमोहन सिंग यांना प्रत्येकी पाच टक्के मतं मिळाली आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या यादीत योगी आदित्यनाथ पहिल्या क्रमांकावर तर पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. मागिल तीन वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर असणा-या ममता बॅनर्जी यावेळी चौथ्या क्रमांकावर गेल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना नऊ टक्के मतं मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ टक्के मतं मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सात टक्के मतांसहित सातव्या क्रमांकावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER