पेड पेंडिंग कृषिपंपांना महिन्यात वीज कनेक्शन

कृषि पंप

मुंबई : लघुदाब विद्युत खांबापासून तीस मीटरपर्यंतच्या कृषिपंपांना (Agricultural Pump) एका महिन्यात विद्युत कनेक्शन मिळणार आहे. याबाबत शासनाने आदेश काढला आहे. त्यामुळे १ एप्रिल २०१८ पासून पेड पेंडिंग असलेल्या कृषिपंप ग्राहकांना वीज कनेक्शन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कृषिपंप कनेक्शन देण्यासाठी राज्य शासनाने दीड हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रा. डॉ. एन. डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली इरिगेशन फेडरेशनतर्फे सुरू असलेल्या लढ्यास यश मिळाले आहे.

कृषी पंप कनेक्शनसाठी एचव्हीडीएस ही जाचक आणि खर्चिक योजना असल्याने शेतकर्यांना कृषी पंप कनेक्शनसाठी अडचणी होत्या. एका कनेक्शनसाठी सुमारे दोन ते अडीच लाख रुपये खर्च करावा लागत होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या ६ वर्षांपासून तब्बल ७५००, तर सांगली जिल्ह्यात १३००० आणि राज्यात लाखो शेतकरी कर्ज काढून कूपनलिका, विहीर, पाईपलाईन करून कनेक्शनच्या प्रतीक्षेत होते.

मार्च महिन्यात डॉ. एन.डी. पाटील यांनी मंत्रालयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना भेटून पूर्वीप्रमाणे शेतकऱयांना कमी खर्चात वीज जोडून द्यावी, अशी मागणी केली होती. १४ जून रोजी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्यासोबत ऊर्जामंत्री राऊत आणि जिल्ह्यातील आमदार, खासदार, इरिगेशन फेडरेशनचे प्रतिनिधी यांची बैठक घेतली. मंत्री राऊत यांनी पूर्वीप्रमाणे सर्व्हिस कनेक्शन देण्याचे आश्वासन दिले होते. आता थेट शासन आदेश झाला आहे. राज्यात तब्बल हजार कनेक्शन मिळणार आहेत. लघुदाब विद्युत खांबापासून २०० मीटरच्या आत किंवा उच्चदाब वाहिन्या खांबापासून ६०० मीटरपर्यंत ९० हजार कनेक्शनचे नियोजन असून उच्चदाब वाहिन्या खांबापासून ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असणाच्या कृषिपंपांना कनेक्शन देण्याचे नियोजन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER