आज मान्सून मुंबईत दाखल होणार, काही तासात पावसाची शक्यता

monsoon

मुंबई : दोन दिवाणसांपुर्वी केरळात दाखल झालेल्या मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. काल पुण्यासह अलिबाग परिसरात मान्सूनचे आगमन झाले होते. या परिसरात तुरळक ठिकाणी चांगलाच पाऊस झाला. दुसरीकडे, नैऋत्य मोसमी वारे वेगाने वाटचाल करत असले तरी बहुतांशी ठिकाणी पाऊस पडत नसल्याचं चित्र आहे. पण पुढील तीन तासांत मुंबईत बहुतांशी ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली(Monsoon will arrive in Mumbai today) आहे.

भारतीय हवामान खात्याच्या मुंबई वेधशाळेनं नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत मुंबई शहरासह, उपनगरात आणि जिल्ह्यात तुरळक ठिकाणी कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं राहू नये, असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button