पावसाळी अधिवेशन : असे असणार विधिमंडळाचे कामकाज

vidhan-bhavan

मुंबई : राज्यावर कोरोनाचं (Corona) मोठं संकट ओढवलं आहे. अशात दोन दिवसाचं पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. पण या अधिवेशानावरही कोरोनाचं संकट दिसून येत आहे. यामुळे यावेळी विधीमंडळ (Vidhan Bhavan) कामकाजात तारांकित आणि लक्षवेधी प्रश्न होणार नाहीत. तसंच दीर्घकालीन चर्चाही होणार नाही. पहिल्या दिवशी अधिवेशनाचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल. विधानसभा सकाळी ११ वाजता तर परिषद दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

यानंतर वेगवेगळ्या खात्याचे कॅबिनेट (cabinet) निर्णय कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी सुमारे १३ नवीन विधेयक सभागृहात मंजूरीसाठी ठेवतील. २०२०-२१ च्या पुरवण्या मागण्या सभागृहात बहुमतासाठी ठेवल्या जातील. विधानसभा अध्यक्ष हे नवीन तालुकापदी नावं जाहीर करतील. तर माजी राष्ट्रपत्ती प्रणब मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील, आमदार अनिल राठोड, सुधाकर पंत परिचारक यासह काही विधीमंडळ सदस्य पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव मांडतील अशी माहिती देण्यात आली आहे.

खरंतर, कोरोनाच्या संकटामुळे अगदी साध्या पद्धतीने अधिवेशन पार पडणार आहे. राज्यात कोरोनाचा धोका हा वाढतच चालला आहे. त्यामुळे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

अशात, मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वेग वाढत असतांनाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबई महानगरपालिका वॉर्ड अधिकारी, उपायुक्त, वैद्यकीय अधीक्षक आणि अधिष्ठाता यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढवा घेतला यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले महाराष्ट्रासाठी पुढचे तीन महिने धोक्याचे आहेत.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER