विधानभवनात प्रवेश मिळत नसल्याची अजितदादांकडे तक्रार; आमदारांना लवकर आत सोडा, उपमुख्यमंत्री पवारांच्या सुचना

DCM Ajit Pawar

मुंबई : आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (monsoon-session) सुरू होत आहेत. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधानभवन परिसरात आमदार व अधिका-यांच्या कोरोना चाचण्या (Corona Test) घेण्यात आल्यात. मात्र, अनेक अधिकारी व आमदारांच्या कोरोना चाचणीचा अहवाल न आल्याने त्यांना विधान भवन परिसरात सोडण्यात आले नाही. यावरून आज सकाळपासूनच विधानभवन परिसरात गोंधळ उडाला आहे.

अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधान भवन परिसरात पाय ठेवताच अनेक अधिकारी व आमदारांनी त्यांना गराडा घातला व आपले गा-हाने सांगितले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांना लवकर आत सोडा अशा सुचना संबंधित अधिका-यांना केल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच उशिराने सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे.

कोरोनाच्या सावटाखालीच यंदाचे पावसाशळी अधिवेशन पार पडणार आहे. कोरोनाची सर्व काळजी घेत हे अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठीच अधिवेशनापूर्वी निवड झालेल्या आमदारांची व अधिका-यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यातील 58 जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच अनेकांचे कोरोनाचे अहवाल न आल्याने त्यांना विधानभवनाच्या बाहेरच ठेवण्यात आले. यामुळे अनेक आमदार अडचणीत आले व त्यांना सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला.

मात्र, सर्वांचे दादा अजित पवार विधानभवन परिसरात येताच अनेकांनी प्रवेश मिळत नसल्याची तक्रार अजित दादांकडे केली. त्यानंतर अजित पवार यांनी आमदरांना लवकर आता सोडा अशा सुचना संबंधित अधिका-यांना केल्यात.

दरम्यान, दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट कायम आहे. विधानभवन परिसरात मुख्यमंत्री उ्ध्वद ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अधिवेशनासाठी दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER