विधिमंडळ पावसाळी अधिवेशन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल होताच भाजप आमदारांची घोषणाबाजी

monsoon session bjp on cm-uddhav-thackeray

मुंबई : विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन (monsoon session) आजपासून सुरु झाले आहे . राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) विधानभवनात दाखल होताच भाजप (BJP) आमदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.

कोरोनाच्या धर्तीवर आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच भाजप आमदारांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच मराठवाड्यातील भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण ७०-३० सुत्र रद्द करा अशी मागणी करत घोषणाबोजी करायला सुरुवात केली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार विधीमंडळात दाखल होताच पुन्हा घोषणाबाजी करायला सुरुवात केली. अजित पवार यांनी या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदारांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER