शोक सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक; युतीच्या जून्या आठवणींना उजाळा

CM Uddhav Thackeray -monsoon session

मुंबई : विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच, देशाच्या राजकारणात महत्त्वाची कामगिरी बजावणारे थोर नेते, थोर सामाजिक नेते अशा सर्वच ज्येष्ठांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली व शोक व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कैलासवासी भाजपच्या नेत्या चंद्रकांता गोयल यांच्याविषयी शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री ठाकरे भावूक झाले व युतीच्या जून्या आठवणींना उजाळा दिला.भाजपच्या दिवंगत वरीष्ठ नेत्या चंद्रकांता गोयल यांचा परिचय व कार्य वाचून दाखवल्यानंतर मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोयल यांच्या काळातील शिवसेना भाजप युतीच्या आठवणी थोडक्यात सांगितल्या.

चंद्रकांता गोयल यांच्या घरी त्यावेळच्या युतीची महूर्तमेढ रोवल्या गेली. युती घडवण्यात त्यांच मोलाचं योगदान होतं असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

चंद्रकांता गोयल यांच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पून्हा एकदा युतीच्या आठवणी जाग्या केल्यात.
शोक सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व थोर दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, आज सुरू झालेले पावसाळी अधिवेशन कोरोनामुळे फक्त दोन दिवस चालणार आहे. अधिवेशनापुर्वी आमदार व अधिका-यांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्यात त्यात अनेक आमदार व अधिकारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळले आहेत.

चंद्रकांता गोयल –

चंद्रकांता गोयल यात्या. त्या विद्यमान रेल्वेमंत्री पिय़ूष गोयल यांच्या मातोश्री होत्या. भारतीय जनता पक्षाच्या वरीष्ठ नेत्या हो राजकारणी होते.1990, 1995 1995 आणि 1999 हे त्या माटूंगा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्या राहिल्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधील मंत्री असलेले वेदप्रकाश गोयल यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते.

प्रणव मुखर्जी –

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 84 व्या वर्षी निधन झाले. 10 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते.

आपल्या पन्नास वर्षांच्या लांबलचक राजकीय कारकिर्दीत प्रणव मुखर्जी यांनी प्रचंड यश मिळवलं.

2012 ते 2017 दरम्यान भारताचे राष्ट्रपती राहिलेल्या प्रणव मुखर्जी यांची ओळख फक्त राजकीय नेत्यापर्यंत मर्यादित नव्हती. प्रणव मुखर्जी यांना एक अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही संबोधलं जाऊ शकतं. सुरुवातीच्या काळात ते शिक्षकही होते. इतकंच नव्हे तर त्यांनी काही काळ पत्रकार म्हणूनही काम केलं आहे.

1984 आणि 2004 मध्ये प्रणव मुखर्जी यांना या पदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात होतं.

इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली तयार झालेले मुखर्जी स्वतः या पदावर हक्क दाखवत होते. पण प्रत्येकवेळी पंतप्रधानपदाने त्यांना हुलकावणी दिली.

प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी 2015 मध्ये एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER