केरळमध्ये मान्सून बरसला, दोन दिवस झाला उशीर

Monsoon rains in Kerala

नवी दिल्ली : आनंदाची बातमी; देवभूमी केरळमध्ये (Kerala) काही भागात मान्सून (Monsoon) बरसला, भारतीय हवामान विभागाने ट्विटरवरुन याची माहिती दिली. केरळच्या काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, असं हवामान विभागाने म्हटले आहे.

काही दिवसांपासून केरळात दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल होण्याची भोगोलिक स्थिती निर्माण झाली होती. हवामान विभागाने म्हटले आहे की, केरळ नंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरू होईल. 11 जून पर्यंत महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

दक्षिण-पश्चिम मान्सून ३ जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मान्सून केरळमध्ये वेळेपेक्षा उशिरा पोहोचला आहे. “केरळमध्ये पावसामध्ये वाढ झाली आहे. दक्षिण अरबी समुद्रात खालच्या पातळीवर पश्चिमेकडे वारे वाहू लागले आहेत,” असंही आयएमडीने म्हटले आहे.

केरळमध्ये सामन्यत: १ जून रोजी मान्सून दाखल होतो. परंतु यंदा दोन दिवस उशिरा आला. याआधी आयएमडीने यंदा मान्सून केरळमध्ये ३१ मे म्हणजेच चार दिवस आधी पोहोचेल असा अंदाज वर्तवला होता. परंतु केरळमध्ये अद्याप मान्सून येण्याची स्थिती निर्माण झालेली नाही अशी माहिती ३० मे रोजी दिली. आयएमडीच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून सामान्य राहील.

स्कायमेटचा दावा

हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट या संस्थेने ३० मे रोजीच केरळात मान्सून दाखल झाल्याचे म्हटले होते. मान्सून वेळेवर दाखल झाल्याचा दावा स्कायमेटने आपल्या ट्वीटमध्ये केला होता.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button