महाराष्ट्राला दिलासा; वेळेपूर्वीच मान्सून दाखल

monsoon,rain-arrived

मुंबई : दक्षिणेकडील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे मागील आठवड्यात श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचा वेग कमी झाला होता. त्यामुळे केरळात मान्सून दाखल (monsoon,rain-arrived) व्हायला तीन दिवसांचा उशीर झाला. पण त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग धरला असून अवघ्या दोन दिवसांत मान्सून केरळातून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दोन दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

आज सकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे याठिकाणी मान्सूनने प्रवेश केला आहे. यानंतर मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला मान्सून व्यापून टाकणार असल्याची सुधारित माहिती हवामान खात्याकडून जारी करण्यात आली आहे. तर ११ ते १५ जून दरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईकरांना मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या आनंदासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button