
दिल्ली :- आधीच्या अंदाजानुसार मान्सून १ जून रोजी केरळमध्ये प्रवेश करण्याची शक्यता होती. पण ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे हवेचे प्रवाह बदलल्याने मान्सून ५ जूनपर्यंत केरळमध्ये पोहचण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहापात्रा मान्सूनच्या आगमनाबाबत माहिती देताना म्हणाले की – “मान्सून केरळच्या किनारपट्टीवर १ जून रोजी दाखल होणार होता. मात्र, अम्फान चक्रीवादळामुळे मान्सूनच्या गतीवर परिणाम झाला आहे. आता १ जूनऐवजी ५ जून रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहचेल.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या महाचक्रीवादळामुळे मान्सूनसाठी लागणाऱ्या अनुकूल परिस्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ५ जूनपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. अम्फानमुळे देशातील वातावरणावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम झाले आहेत.”
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला