खुशखबर : पावसाळा संपला, हवामान खात्याची माहिती

monsoon is over, weather department information.jpg

पुणे : नेर्ऋत्य मोसमी पावसाने (monsoon) काल, बुधवारपासून संपूर्ण देशातून निरोप घेतला. केरळमध्ये १ जूनला दाखल झालेला मोसमी पाऊस ४ महिने २७ दिवस देशात सक्रिय होता. या काळात देशात समाधानकारक पावसाची नोंद झाली. आता पावसाळा संपला असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केले आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा भारतातील १ जूनला केरळ आणि त्यानंतर देशभर प्रवेश केला. केरळच्या किनारपट्टीवर जोरदार बरसल्यानंतर ११ जूनला त्याने महाराष्ट्रात पावसाल सुरुवात झाली. यंदा मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने मोसमी वारे सक्रिय झाले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळातच या भागात पावसाने जोर धरला होता. १४ जूनला मोसमी पावसाने महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर त्याचा देशातील प्रवास अधिक वेगवान झाल्याने संभाव्य वेळेच्या १२ दिवस आधी म्हणजे २६ जूनला त्याने देश व्यापला होता.नियोजित आणि अंदाजित वेळेपेक्षा उशिरा २८ सप्टेंबरला पश्चिम राजस्थानमधून मोसमी पावसाने परतीचा प्रवास सुरू केला. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यातील काही भागांपर्यंत तो माघारी फिरला असतानाच ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तीव्र पट्टा निर्माण झाला आणि त्याने आंध्र प्रदेश, तेलंगणापासून महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यामुळे या भागात धुवाधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. या कालावधीत मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास थांबला होता. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता ओसरताच त्यानी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. हवामानाची स्थिती पाहता २८ ऑक्टोबपर्यंत महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मोसमी वारे निघून जातील, असा हवामान विभागाचा अंदाज होता. त्यानुसार मोसमी वाऱ्यांनी देशाचा निरोप घेतला. तरीही नियोजित वेळेपेक्षा पावसाने परतीचा प्रवास 14 दिवसांनी लांबला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER