मान्सून केरळात दाखल; २ ते ४ जूनदरम्यान मुंबईत बरसणार!

Monsoon

मुंबई : राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता केरळकडून गुड न्यूज आली आहे. मान्सून अखेर केरळात दाखल झाला आहे. हवामान विभागाने जो अंदाज वर्तवला होता त्याआधीच मान्सून केरळात दाखल झाला आहे. तर मुंबईत येत्या २ ते ४ जूनदरम्यान मान्सून प्रवेश करेल, असे हवामानाविषयी माहिती देणाऱ्या खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितले आहे.

भारतीय हवामान विभागानं (IMD) १ जूनला मान्सून केरळात दाखल होणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. मात्र, बंगालच्या खाडीतील सुपर सायक्लोन अम्फाननंतरही मान्सूनने केरळात दोन दिवसांपूर्वीच म्हणजे ३० मे रोजी आगमन केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER