मान्सून वेळेच्या २ दिवस आधीच केरळमध्ये आला! स्कायमेटचा दावा

Monsoon

कोची :- मान्सून वेळेच्या २ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे. शनिवारी स्कायमेटने ट्वीट करून ही माहिती दिली आहे. रविवारी सकाळी दक्षिण भारतासह अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळच्या भागात ढगाळ वातावरण आहे.

तामीळनाडूसह पश्चिम कर्नाटकात ढगाळ वातावरण आहे. कर्नाटक आणि गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकणातही हवामात बदल आहे.

दरम्यान, केरळच्या वेशीवर असलेला मान्सून महाराष्ट्रात कधी पोचणार याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीच्या १०० टक्के म्हणजे सामान्य होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या वृत्ताला हवामान विभागाकडून अद्याप दुजोरा देण्यात आला नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात वेगात बदल होतो आहे, असे हवामान खात्याने म्हणले आहे.


Web Title : Monsoon arrives in kerala 2 days ahead of time

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER