‘साधू नालायक असतात’, वडेट्टीवारांच्या या विधानावर भाजप आक्रमक

Tushar Bhosale - Vijay Wadettiwar

मुंबई :- महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीसाधूंबाबत केलेल्या विधानामुळे एक नवा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधू आणि संत यांच्यातील फरक विशद करताना विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. साधू आणि संत वेगळे असतात. साधूंवर विश्वास ठेऊ नका, साधू नालायक असतात, असं वादग्रस्त विधान वडेट्टीवार यांनी केलं आहे. आपल्या वक्तव्याचा हा व्हिडीओ वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर विजय वड्डेट्टीवार यांच्यावर भाजप अध्यात्मित आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सडकून टीका केली. साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जाण्याचा इशाराही तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी दिला आहे.

साधू आणि संत यांच्यातील फरक समजावताना विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं की, संत वेगळे आणि साधू वेगळे असतात. साधूंवर अजिबात विश्वास ठेऊ नका. साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत. संत समाजासाठी समर्पित होऊन काम करतात. तर साधू म्हणजे साधवून घेणारे संधी साधू असतात. चावणाऱ्या विषारी विंचूलाही जो वाचवतो ते संत असतात, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दरम्यान, वडेट्टीवारांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेत भाजप (BJP) अध्यात्मिक सेलचे तुषार भोसले (Tushar Bhosale) म्हणाले की, साधूंना नालायक म्हणणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना मंत्री म्हणवून घेताना लाज वाटली वाटायला हवी. तुम्ही मंत्री झालात म्हणून तुम्हाला साधूंना शिव्या घालण्याची परवानगी मिळालेली नाही. माझा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सवाल आहे की, हिंदू समाजाला हे दिवस दाखवण्याकरता तुम्ही मुख्यमंत्री झाले आहात का? तुमचे मंत्रीच जर साधू-संताना शिव्या-शाप देणार असतील तर का साधूंच्या हत्या होणार नाहीत. सोनिया गांधींचा (Sonia Gandhi) हिंदू धर्म विरोधी अजेंडा राबवण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का? असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला. विजय वडेट्टीवार यांनी साधूंची माफी मागावी अन्यथा परिणामांना सामोरं जा, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER