खेळांच्या मैदानांवर ‘मंकी बात’, नेटवर कॉमेंट्सची धमाल

Monkey - Maharastra Today

कोरोनामुळे (Corona) विविध क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणी प्रेक्षकांना बंदी आहे. काही ठिकाणी अगदी मर्यादीत संख्येत प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येत आहे मात्र यानिमित्ताने माकडांची चंगळ झाली आहे. ‘हे मैदानचं माझे घर’ या थाटात ते स्टेडियम किंवा मैदानांठिकाणी घुसखोरी करत आहेत. काही नेटकऱ्यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत.

नवी दिल्लीतील शूटींग वर्ल्ड कप (ISSF World Cup) स्पर्धेवेळी 10 मी एअर रायफलची रेंज असलेल्या सभागृहात माकडे दिसून आली. छताला तोलून धरणारे जे बीम होते त्यावर त्यांनी ठाण मांडले होते.

पतियाळा येथे फेडरेशन कप अॕथलेटिक्स (Federation Cup Athletics) स्पर्धेवेळीही माकडांनी हजेरी लावली. अॕथलेटिक्स ट्रॕकला लागून असलेल्या कुंपणावर माकडे बसून असलेली दिसली. एकाने तर कुंपणात असलेला पोल पकडून ठेवलेला फोटो व्हायरल झालाय. त्यावर भारतीय अॕथलेटिक्स महासंघाने ट्विट करताना म्हटलेय की, असं वाटतंय की आमच्या या छोट्या दोस्ताला पोल व्हाॕल्टची मोठी आवड आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi stadium) या जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये कोरोनापायी प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात आला असला तरी माकडांना येथे येण्यापासून कुणीही रोखू शकलेले नाही. त्याचाही फोटो व्हायरल झाला आहे. काहींनी त्या फोटोला ‘मंकी बात’ अशी काॕमेंट टाकली आहे. एकाने तर या माकडांपैकी एक इंग्लिश खेळाडू मायकेल वाॕनसारखा दिसत असल्याचे म्हटले आहे. माकडांनासुध्दा सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व समजलेय, आम्हाला कधी समजणार? असा सवाल काहींनी केला आहे तर काहींनी यांचे मास्क कुठे आहेत, अशी काॕमेंट केली आहे. काहींनी म्हटलेय की, भक्तांना नरेंद्र मोदी स्टेडियमवरच्या सामन्यासाठी स्पेशल पास देण्यात आला आहे. काहींनी हे शुक्रवारच्या सामन्यातील टेलिव्हिजन पंच तर नाहीत ना, अशी शेरेबाजी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER