माकडाने केळ घेतल्यानंतरच दिली रुग्णवाहिकेची किल्ली

monkey gave key of Ambulance after taking banana

बेळगाव : कोरोनासाथीच्या (Corona Virus) काळात रुग्णवाहिकांची वर्दळ वादळी आहे. येथे एका माकडाने (monkey) रुग्णवाहिकेची किल्ली (key of Ambulance) कडून घेतल्याने रुग्णवाहिकेचा अर्धा तास खोळंबा झाला. ही घटना बेळगावातील के. एल. ई. हॉस्पिटलच्या (K. L. E. Hospital) आवारात घडली.

रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर चावी तशीच सोडून बाहेर गेला होता. तेवढ्यात एका माकडाने रुग्णवाहिकेची किल्ली काढून घेतली. सुदैवाने ते दूर गेले नाही; रुग्णवाहिकेच्या टपावर बसून किल्लीशी खेळत होते.

ड्रायव्हर रुग्णवाहिका नेण्यासाठी आल्यावर माकडाने किल्ली पळवल्याचे त्याच्या लक्षात आले. सुमारे अर्धा तास तो माकडाजवळून किल्ली घेण्याचा प्रयत्न करत होता पण माकड किल्ली देत नव्हते. दरम्यान, कुणीतरी ड्रायव्हरला केळी आणून दिली. ड्रायव्हरने माकडाला केली दाखवल्यानंतर त्याने किल्ली सोडून केळ घेतले. ड्रायव्हरने लगेच किल्ली उचलून घेतली आणि रुग्णवाहिका घेऊन गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button