
लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मोदी सरकार आणत असलेल्या शेतकरी सन्मान योजनेला येत्या २५ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. २५ तारखेला गोरखपूर येथे शेतकऱ्यांचा मोठा मेळावा भरत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी बटण दाबून पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करतील.
ही बातमी पण वाचा:- मोदी येत्या शनिवारी पांढरकवडा येथे येणार
निवडणुकीची आचार संहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताज्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना अंमलात आण्याची घाई सरकारने चालवली आहे.
मोरेश्वर बडगे