ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर पैशांची उधळण ही तर मोगलशाही; माजी ऊर्जामंत्र्यांचा प्रहार

Chandrashekhar Bawankule

नागपूर : एकीकडे कोरोनामुळे (Corona) राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, उद्योजक यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र दुसरीकडे राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येत आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या सरकारी बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे भाजप (BJP) अधिकच आक्रमक झाली आहे.

यावरून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपुरात (Nagpur) झालेल्या पत्रकार परिषदेत यांचा समाचार घेतला. कोरोनाचे संकट असताना मंत्र्यांनी बंगले आणि कार्यालयांवर केलेला खर्च योग्य नाही. त्यांनी कार्पोरेट ऑफिस तयार केले. सुमारे १०० ते १५० कोटी रुपये बंगल्यांवर खर्च करण्यात आले. हा खर्च अनाठायी होता. शेतकऱ्यांना सरकार पैसे देत नाही. वीज बिल माफ करत नाही. कोरोनाचं संकट आहे आणि मंत्री बंगल्यांवर खर्च करत आहेत. हे काय चाललंय? ही मोगलशाही आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून (MSEDCL) कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. तरीदेखील महावितरण विभाग तोट्यामध्ये असल्याचे सांगून अनेकांची वीज सरकारकडून तोडण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च करून सरकार पैशांची उधळपट्टी करत असल्याचे आरोप भाजपने केले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं सरकारी निवासस्थान आणि कार्यालयाच्या पुनर्बांधणीवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. अतिशय ऐषारामाचा माहोल त्या ठिकाणी बंगल्यामध्ये करण्याचे काम सरकारकडून करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER