जस्सी फेम मोना सिंग अडकली लग्नबंधनात

Mona Singh

मुंबई :- ‘जस्सी जैसी कोई नहीं’ मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री म्हणजे मोना सिंग. छोट्या पडद्यावरची जस्सी अर्थात मोना शुक्रवारी विवाहबंधनात अडकली. मोना सिंग आणि तिचा बॉयफ्रेन्ड श्याम गोपालन पारंपरिक पंजाबी पद्धतीनं लग्नबंधनात बांधले गेले.

लाल रंगाचा लग्नाचा जोडा परिधान केलेल्या मोनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. मोनाने तिच्या लग्नाबद्दल फार गाजावाजा केला नव्हता. कुटुंबीय आणि जवळची मित्रमंडळी तिच्या आणि श्यामच्या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते. या नवदाम्पत्याचे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या मित्रपरिवारानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amandeep Singh Narang (@narangamandeepsingh) on