बांगला फलंदाज मोमीनुल हकने केली ब्रॅडमन, हॉब्ज यांची बरोबरी

Mominul Haq

बांगलादेशचा (Bangla Desh) कर्णधार मोमीनुल हक (Mominul Haq) याने विंडीजविरुध्दच्या पहिल्या कसोटीत 115 धावांची खेळी केली आणि यासह बांगलादेशसाठी 10 कसोटी शतकं करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याच्याआधी तामीम इक्बालचे (Tamim Iqbal) बांगला संघासाठी 9 कसोटी शतकं होते.

विशेष म्हणजे मोमीनुलची 10 च्या 10 शतकं आपल्याच देशात आहेत. एकही परदेशात नाही. या 10 शतकांपैकी 7 शतकं त्याने चित्तोग्रामच्या झेडएसी स्टेडियम या एकाच मैदानावर केले आहे. यासह एकाच मैदानावर सर्वाधिक कसोटी शतकं करणाऱ्या मायकेल क्लार्क (अॕडिलेड), महेला जयवर्धने (गाॕल) व कुमार संघकारा (गाॕल) यांच्या पंक्तीत तो जाऊन बसलाय.

मोमीनुलच्या आधी मायदेशातच सुरुवातीची सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम इंग्लंडच्या अॕलन लॕम्बच्या नावावर होता. त्याने आपली पहिले नऊ शतकं इंग्लंडमध्येच केली होती.

बांगलादेशसाठी 10 कसोटी शतकं करणारा पहिला फलंदाज ठरुन मोमीनुल हा जॕक हॉब्ज (Jack Hobbs) , डॉन ब्रॅडमन (Don Bradman), जाॕर्ज हेडली, पाॕली उम्रीगर (Polly Umrigar) , हनिफ मोहम्मद, मार्टिन क्रो, अरविंद डिसिल्वा, गॕरी कर्स्टन आणि अँडी फ्लॉवर यांच्या पंक्तीत जाऊन बसलाय.

प्रत्येक संघासाठी 10 कसोटी शतके करणारा पहिला फलंदाज

इंग्लंड- जॕक हॉब्ज – 1925
आॕस्ट्रेलिया- डाॕन ब्रॅडमन – 1931
वेस्ट इंडीज- जाॕर्ज हेडली – 1939
भारत – पाॕली उम्रीगर – 1961
पाकिस्तान – हनिफ मोहम्मद – 1965
न्यूझीलंड – मार्टिन क्रो – 1989
श्रीलंका – अरविंद डिसिल्वा – 1997
दक्षिण आफ्रिका – गॕरी कर्स्टन – 1999
झिम्बाब्वे – अँडी फ्लाॕवर – 2001
बांगला देश – मोमीनुल हक – 2021

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER