आई बरेच सल्ले देते.. !

Virajas Kulkarni & Mrinal Kulkarni

मराठी इंडस्ट्रीत अनेक कलाकारांची मुलं ही पुढे त्यांच्या पाऊला वर पाऊल ठेवत या इंडस्ट्रीत पदार्पण करतात. अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांची मुलं आज इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांचा सुपुत्र विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) देखील मालिका विश्वात आला आहे. मालिके आधी विराजस ने नाटकं केली आहेत. झी मराठी वरील ” माझा होशील ना ” या मालिकेतील त्याच ” आदित्य ” हे पात्र चांगलंच गाजतय. विराजस एक उत्तम अभिनेता तर आहे पण तो तेवढं उत्तम लिखाण  सुद्धा करतो. अभिनय , लेखन आणि दिग्दर्शन अश्या अनेक जवाबदाऱ्या तो लीलया पार पाडतो. अभिनयाच्या सोबतीने त्याला दिग्दर्शन क्षेत्रात आपलं असं काहीतरी करण्याची खास इच्छा आहे. नुकताच शिक्षक दिन पार पडला आणि त्याने आई सोबत एक खास फोटो शेयर करत ” माझ्या आयुष्यातली पहिली शिक्षिका ” असं लिहिलं होतं. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. विराजस कडून ऐकू या त्यांचा खास आई विषयी ….

” माझी आई देखील सल्ले देते “

प्रत्येक आई ही आपल्या मुलांना कायम सल्ले देत असते तशीच माझी आई देखील मला कायम सल्ले देत असते. दोघे ही एकाच क्षेत्रात काम करतो त्यामुळे कामाच्या निमित्ताने किंवा रोजच्या आयुष्यात ती मला नेहमीच काहीतरी सांगत असते. आयुष्यात नेहमी वेगवेगळे पर्याय ठेव हा आईचा सल्ला खरंच खूप मोलाचा आहे. एकच पर्याय न ठेवता आयुष्यात नेहमीच वेगवेगळे पर्याय असावेत अस ती सांगते.

” अभिनेता होऊ नकोस “

आईने ने मला आधीच सांगितलं होतं काही ही हो पण अभिनेता होऊ नकोस कारण अभिनेता होण्यासाठी जेवढी मेहनत आवश्यक आहे तेवढं आपल नशीब सुद्धा आवश्यक आहे. एक अभिनेता म्हणून प्रेक्षक आपल्याला पसंत करतील असं नाही. त्यामुळे आई लहानपणी सुट्टी असली की मला लेखन करायला लावायची. म्हणून आज मला या गोष्टीचा खूप फायदा होतो. आईचा पहिला चित्रपट करताना घरीच ऑफिस तयार झाल तर या सगळ्या प्रक्रियेतुन  मी दिग्दर्शन आणि लिखाणा कडे वळलो.

” आई सोबत काम करायचं “

आई ही उत्तम अभिनेत्री आहे त्यामुळे नक्कीच तिच्या सोबत काम करण्याची इच्छा आहे. आई सोबत स्क्रीन शेयर करण्यापेक्षा तिला दिग्दर्शित करायला आवडेल. सोबत अभिनय न करता एखाद्या प्रोजेक्टचं मी दिग्दर्शन करून तिला त्यात काम करायला आवडेल अशी आमचा दोघांची इच्छा आहे.

” अभिमानास्पद गोष्ट “

जेव्हा ” माझा होशील ना ” चा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा आईला खूप अभिमान वाटला होता. तिच्या कामामुळे तिला फारसा टीव्ही बघायला मिळत नाही म्हणून आता लॉक डाऊन मध्ये ती आवर्जून मालिका बघते. तिला माझं काम आवडत आणि मला ते ऐकून खूप आनंद आणि उत्साह मिळतो. ती नेहमीच माझ्या कामाचं कौतुक करते आणि हेच बघून मला काम करण्याचा वेगळा उत्साह मिळतो.

आई माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे माझ्या प्रत्येक अभिनयासाठी ती नेहेमीच साथ देते. माझ्यासाठी आई एक मूर्तीमंत उदाहरण आहे तिच्या प्रत्येक कामांतून मी अनेक गोष्टी शिकत असतो. तिच्याकडे बघून मी अभिनय शिकलो आहे तर मला तिच्या नवनवीन कामातून खूप गोष्टी शिकायला मिळतात. तिच्यात उत्साहाचा झरा आहे त्यामुळे तिच्याकडे बघून मला एक वेगळीच सकारात्मक पॉवर मिळते काम करण्याची ऊर्जा मिळते.

अभिनयाच्या सोबतीने विराजस उत्तम दिग्दर्शन देखील करतो. अभिनय , लेखन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात चोख काम करून आज त्याने स्वतःची वेगळी ओळख संपादन केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER