दारूच्या नशेत धुंद ड्रायव्हरचे स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

rape

नागपूर : सरकार मुली व महिलांसाठी कठोर कायदे करण्याचे आणि शिक्षा करण्याचे आश्वासन देते. मुलींवर अत्याचाराच्या घटनात तुरुंगवास भोगावा लागतो. मात्र तरीही मुली व महिला आजही सुरक्षित नाहीत हे नागपुरातील एका घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दारूच्या नशेत धुंद असलेल्या एका स्कूल व्हॅनच्या चालकाने त्याच्याच व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना नागरिकांनी रंगेहाथ पकदे व चांगलेच चोपले. नशेतच तो स्कूल व्हॅन चालवित होता. यामुळे व्हॅनने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात होता. तसेच स्कूल व्हॅनवर नजर ठेवणाऱ्या शासकीय विभागांचा निष्काळजीपणाही यातून उघडकीस आला आहे.

ही बातमी पण वाचा : नवीमुंबईतील एमजीएम स्कुलमधील सातवीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

इमामवाडा पोलीस ठाण्यासमोर ३० वर्षीय आरोपी आशिष मनोहर वर्मा याला स्कूल व्हॅनमध्ये सहा वर्षाच्या विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडण्यात आले. नागरिकांनी आरोपीला चांगला चोप दिला. ऐन वेळेवर पोलिसांनी येऊन त्याला नागरिकांच्या तावडीतून सोडवले. त्यामुळे त्याचा जीव वाचू शकला. पोलिसांना संशय आहे की, आरोपीने इतर मुलींसोबतही अशाच प्रकारचे कृत्य केले असावे. त्याला आज न्यायालयासमोर सादर करून न्यायिक तुरुंगात पाठवण्यात आले.

आशिष गेल्या ८-९ वर्षांपासून स्कूल व्हॅन चालवित आहे. पीडित मुलगी आणि तिचा पाच वर्षाचा भाऊ त्याच्या व्हॅनमधून शाळेत ये-जा करतात. असे सांगितले जाते की, सकाळपासूनच आरोपी दारूच्या नशेत धुंद होता. व्हॅनमध्ये स्वार इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर पीडित मुलगी व तिच्या भवाला घेऊन तो इमामवाड्यात आला. त्याने इमामवडा ठाण्यजवळील टिंबर मार्केटजवळ व्हॅन उभी केली. त्याने मुलीच्या भवाला ५० रुपये देऊन समोसे व कुरकुरे आणायला सांगितले. तो गेल्यानंतर त्याने मुलीला मागच्या सीटवर नेले आणि तिच्याशी अश्लील चाळे करू लागला. दरम्यान रस्त्याने जात असलेल्या एका तरुणीची व्हॅनवर नजर गेली. तिला संशय आल्याने ती व्हॅनजवळ गेली तेव्हा आशिष दिसला. तिने आरडाओरड करून लोकांना बोलावले. तेव्हा आशिषचे कृत्य उघडकीस आले. नागरिकांनी त्याला चांगले झोडपले. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.

आशिषच्या कृत्यामुळे नगारिकांमध्ये प्रचंड रोष होता की, त्यांनी त्याचे केस ओढून त्याला जिवंत जाळण्याची तयारी केली होती. लोकांचे म्हणणे होते की, अशा गुन्हेगारांना जिवंत सोडायलाच नको. नागरिकांचा संताप पाहून पोलिसही हादरले होते. त्यांनी संयमाने काम घेऊन नागरिकांच्या तावडीतून आरोपीला सोडविले.

ही बातमी पण वाचा : पाताळ भुवनेश्वर गुहेत आहे सृष्टीच्या निर्मितीपासून अंताची माहिती!