मोईन अलीच्या वडिलांचा तस्लिमा नसरीन यांना सवाल, ‘एवढ्या साऱ्या लोकांमध्ये माझाचा मुलगा मिळाला का?’

Taslima Nasreen - Munir Ali - Maharastra Today
Taslima Nasreen - Munir Ali - Maharastra Today

आपली मते जी काही असतील ती मांडण्यासाठी जगात असंख्य लोकं असताना तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांना माझाच मुलगा मिळाला का, असा उद्विग्न सवाल इग्लंडचा (England) अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अली (Moeen Ali) चे वडिल मुनीर अली (Munir Ali) यांनी केला आहे.

‘मोईन अली क्रिकेटमध्ये नसता तर तो सिरियामध्ये इस्लामीक स्टेट अर्थात आयसीस(ISIS) या संघटनेत असता असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह व्टिट तस्लिमा नसरीन यांनी केले आहे. या असल्या विधानाने मुनीर अली अतिशय व्यथीत झाले असून त्यांनी आपली वेदना बोलून दाखवली आहे.आपल्या मुलाने आपल्या मनाचे ऐकत आणि आपल्याला विश्वास वा श्रध्दा असलेल्या गोष्टी करताना बऱ्याच समजांना तडा दिला असल्याचे मुनीर यांनी म्हटले आहे.

तस्लिमा यांच्या आपल्या मुलासंदर्भातील क्लेशदायी टिप्पणीने आपल्याला धक्का तर बसलाच आहे पण अतिव दुःखसुध्दा झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपले हे व्टिट उपहासात्मक असल्याचे स्पष्टीकरण तस्लीमा यांनि दिले असले तरी त्या कट्टरवादाविरुध्द लढत असल्याचे म्हणतात पण त्यांनी स्वतःकडे पाहिले तर त्यांनी जे ट्विट केलेय ते कट्टरवादाचेच उदाहरण आहे. एका मुस्लीम व्यक्तीविरुध्द तो घातक हल्लाच आहे.त्यांचे हे विधान इस्लामोफोबीक (Islamophobic) असेच आहे. ज्यांना आत्मसन्मान नाही आणि इतरांबद्दल आदर नाही अशा व्यक्तीच एवढ्या खालच्या पातळीवर येऊ शकतात अशी टीका मुनीर अली यांनी केली आहे.

खरं सांगायचे तर माझा अतिशय संताप झालाय पण मी संतापात वाहवत गेलो तर तस्लिमासारख्या लोकांना जे हवंय तेच होईल. पण कधी भेट झाली तर तिच्याबद्दल मला काय वाटते ते मी तिला स्पष्ट सांगेल. सध्या तरी त्यांनी उपाहास या शब्दाचा अर्थ काय आहे, याचा शोध घ्यावा एवढेच मी सांगेन. त्यांना वाटते तसा तो नक्कीच नाही. ज्या व्यक्तीला तुम्ही ओळखतसुध्दा नाही त्याच्याविरुध्द जहर ओकायचे आणि त्याला उपाहास म्हणत माघार घ्यायची हे योग्य नाही. आपले हेतू साधण्यासाठी जगभरात अब्जावधी लोकं असताना त्यांना माझाच मुलगा मिळावा याचे आश्चर्य वाटते. अख्ख्या क्रिकेट जगताला माहित आहे माझा मुलगा कसा आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी मला पुनरुच्चार करावा लागतोय अशा भावना मुनीर यांनी व्यक्त केल्या आहेत.

पाक नियंत्रित काश्मिरमधील मिरपूरचे हे अली कुटुंब. मुनीर यांचे वडील म्हणजे मोईनचे आजोबा हे ब्रिटनमध्ये स्थलांतरीत झाले आणि त्यांनी एका इंग्लिश तरुणीशी विवाह केला. मुनीर यांना स्वतः ला क्रिकेटची भारी आवड पण क्रिकेटपटू बनण्याचे आपले स्वप्न ते साकार करु शकले नाहीत आणि आपल्या मुलांच्या माध्यमातून त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले.

ते म्हणाले की नसरीनसारखे द्वेष करणारे लोक भेटतच आले आहेत. एका सामन्यावेळी तो मैदानात उतरला तेंव्हा कुणीतरी ओरडले होते, ‘ती दाढी काढून ये!’ काही प्रशिक्षक मला सांगायचे की, बघा, हे इंग्लंड आहे. ती दाढी ठेवायची का याचा विचार करा. मी चिंतीत होऊन मोईनला सांगायला गेलो तर तो म्हणाला की, हा माझा विषय आहे. काळजी करु नका असा तो खंबीर माणूस आहे. त्याला टीकेची पर्वा नसते आणि तो कुणाला घाबरत नाही असे मोईनबद्दल त्यांनी सांगितले.

भारत दौऱ्यावर तर एका प्रशिक्षकाला मोईनने स्पष्ट सांगितले होते की भलेही एकवेळ तो क्रिकेट सोडेल, पण त्याची श्रध्दा सोडणार नाही. मी खेळेल तर मी जसा आहे तसाच खेळेल (अर्थात दाढी काढणार नाही). त्या दौऱ्यात त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. याबद्दल विचारले तेंव्हा त्याने स्पष्ट शब्दात सांगितले की या दौऱ्यावर काय शिकायला मिळाले तर फक्त नेट प्रॕक्टिस, जी मला इंग्लंडमध्येसुध्दा मिळू शकली असती. अशा प्रकारचा तो खंबीर व्यक्ती आहे. या वादातुनही तो बाहेर पडेल पण कुणीही उठावे आणि आपले नाव घ्यावे, आपल्याबद्दल काहीबाही बोलावे हे तो खपवून घेणार नाही असेही त्यांनी मोईनबद्दल सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button