हा तर भारताच्या नवनिर्माणाचा शुभारंभ – मोहन भागवत

mohan-bhagwat

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा (Ram Temple Bhumi Pujan) सोहळा पार पडला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. यावेळी भागवत म्हणाले की, जगाचे कल्याण करणारा भारत स्वतःच्या कल्याणाचा शुभारंभ आज आणि या व्यवस्थेचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हस्ते होतेय. याचाही आनंद आहे. ” असे प्रतिपादन मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. सर्वोच्च न्यायालयानं (SC) निकाल दिल्यापासून मंदिराच्या कामाला सुरुवात कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर मंदिराची पायाभरणी झाली असून, लवकरच कामालाही सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त बोलताना सरसंघचालक भागवत म्हणाले, “आनंदाचा क्षण आहे. एक संकल्प घेतला गेला होता. देवरसजींनी सांगितलं होतं की, २०-३० वर्षं काम करावं लागेल. तेव्हा हे पूर्ण होईल प्रयत्न केले.

ही बातमी पण वाचा:- गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न आज साकार झाले आहे – मोदी

अनेकांनी बलिदान दिलं. पदयात्रा करणारे अडवाणीही आज घरातून हा कार्यक्रम बघत असतील. अनेक जण उपस्थित राहू शकले असते; पण परिस्थिती तशी नाही आहे. प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातील पुरुषार्थ आपल्या कणाकणात आहे. आपल्या सगळ्यात राम आहे. इथे भव्य मंदिर बनेल.

सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे. दायित्व दिलेलं आहे. आता आपल्या सगळ्या मनातील अयोध्येला सजवायचं आहे. सगळ्यांची उन्नती करणारा धर्म, त्याचा ध्वज खांद्यावर घेऊन सगळ्या विश्वाला सुखशांती देणारा भारत आपण निर्माण करू शकू, त्यासाठी आपल्याला मनातील अयोध्या बनवायची आहे. जसं जसं मंदिर बनत जाईल, तसं तसं हे करायचं आहे. राम मंदिर उभं राहण्याआधी आपलं मन मंदिर तयार व्हायला हवं. त्याची गरज आहे.” असे भागवत यावेळी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER