…आणि मोहम्मद सिराजला रडू कोसळले

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या (India Vs Australia) तिसऱ्या कसोटी सामन्याच्या आरंभी सिडनी (Sydney) क्रिकेट मैदानावर अतिशय भारलेले वातावरण होते आणि त्यात भावनावश होऊन जलद गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) राष्ट्रगीतावेळी अश्रू आवरणे कठीण गेल्याचे दिसून आले.

सामन्याच्या आरंभी आपल्या राष्ट्रगीतावेळी हा प्रसंग घडला. त्यावेळी मोहम्मद सिराज आपले अश्रू वारंवार पुसतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर डेव्हिड वाॕर्नरला बाद करून त्यानेच भारताला पहिले यश मिळवून दिले. कोणत्याही खेळाडूसाठी स्टेडियममध्ये सामन्याआधी राष्ट्रगीत म्हणणे आणि राष्ट्रध्वजाखाली उभे राहणे हा अत्युच्च आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.

त्यामुळेच आपला दुसरा कसोटी सामना खेळणारा मोहम्मद सिराज आपल्या भावनांना आवर घालू शकला नाही.मेलबोर्न येथील कसोटीत पदार्पणात चांगली कामगिरी करून मोहम्मद सिराजने कर्णधार अजिंक्य रहाणेसह सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवली होती. मोहम्मद सिराजसाठी हा ऑस्ट्रेलिया दौराच भावनामय आहे; कारण तो ऑस्ट्रेलियात असतानाच इकडे त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. मात्र त्यानंतरही सिराजने कर्तव्याला प्राधान्य देत अंत्यसंस्कारासाठी मायदेशी येणे टाळले होते. त्यानंतर यशस्वी कसोटी पदार्पण साजरे करून त्याने आपल्या वडिलांचे स्वप्न साकार केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER