भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात

mohammad azharuddin

राजस्थान : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या कारला  आज राजस्थानमध्ये मोठा अपघात झाला. लालसोट-कोटा महामार्गावर सूरवाल ठाण्याजवळ हा अपघात झाला. सुदैवाने अझरुद्दीन हे या अपघातातून थोडक्यात बचावले. मोहम्मद अझरुद्दीन हे कुटुंबीयांसह रणथंबोर येथे येत असताना लालसोटकोटा मेगा हायवेवर हा अपघात झाला आहे.

सूरवाल पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली. माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अझरुद्दीनसोबत आलेल्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असल्याचं समोर आलं आहे. अपघातानंतर मोहम्मद अझरुद्दीन हे दुसर्‍या वाहनाने हॉटेलवर पोहचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अझहर आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे ते ठीक असल्याचे समजताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि प्रथमोपचारानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER