मोदींचे ‘ते’ ट्विट ठरले २०१९ चे ‘गोल्डन ट्विट’

PM Modi

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं एक ट्विट २०१९ या वर्षातील सर्वात जास्त लाईक मिळालेलं आणि जास्त रिट्विट करण्यात आलेलं गोल्डन ट्विट ठरलं आहे.

देशात वा परदेशात घडणाऱ्या घटनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मत व्यक्त करत असतात. २०१९ या वर्षात पंतप्रधान मोदी यांनी असंच एक ट्विट केलं होतं. जे वर्षातील गोल्डन ट्विट ठरलं आहे. ट्विटरनेच यांची घोषणा केली आहे. २०१९मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं. निकाल आल्यानंतर मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. तेच गोल्डन ट्विट ठरलं आहे.

सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत
Together we grow.
together we prosper.
together we will build a strong and inclusive india.
india wins yet again! # vijayibharat
असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. हे ट्विट भारतातील सगळ्यात जास्त रिट्विट करण्यात आलं. त्याचबरोबर सगळ्यात जास्त लाईक्स या ट्विटला मिळाल्या आहेत. ट्विटरने याची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे सगळ्यात जास्त वापरण्यात आलेला हॅशटॅगही निवडणुकीशी संबंधित आहे. #loksabhaelections2019 हा हॅशटॅग सर्वात जास्त वापरण्यात आला. तर सर्वाधिक वापरण्यात आलेला दुसऱ्या क्रमांकावरील हॅशटॅग #chandrayaan2 ठरला आहे. तर तिसऱ्या क्रमाकांवर #CWC19 हा हॅशटॅग आहे.