मोदींच्या घोषणा फसव्या, विकास नव्हे तर विखार हा अजेंडा; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

PM Modi-Prithviraj Chavan

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचा नव्हे तर विखाराचा राष्ट्रीय अजेंडा राबवत आहेत, अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. “मोदी आणि शहा यांचा कारभार दडपशाहीचा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवून मोदींनी हुकूमशाही लागू केली आहे. बहुमत नसताना कायदा मंजूर केला आणि हिंदू-मुस्लिम वाद उभा केला आहे.” असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्यावर चौफेर टीका केली. मोदींनी पुलावामतील शहिदांचा राजकीय वापर केला. मात्र, गलवान खोऱ्यात २० भारतीय जवानांचा बळी गेला, तरीही मोदी शांत राहिले. गेल्या ४५ वर्षांच्या इतिहासात कधीही अशी घटना घडली नव्हती. मोदींच्या या अहंकाराने भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कोरोना सुरू होण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर कमी होता. सद्य:स्थितीत भारताचे दरडोई उत्पन्न बांगलादेशपेक्षाही कमी आहे. आत्मनिर्भरतेच्या नावाखाली मोदींनी अनेक सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करून त्यांची वाट लावली, अशी टीका त्यांनी केली.

लॉकडाऊनचे नियोजन नाही
“कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी लॉकडाऊन लावताना मोदी सरकारने कोणतेही नियोजन केले नाही. यामुळे अनेक स्थलांतरित कामगारांचा बळी गेला. या महामारीमुळे देशभरात साडेबारा हजार कोटी रुपयांचे रोजगार गेले. मोदी सरकारने त्यांना कसलीच मदत दिली नाही. कोरोनाकाळात मोदी सरकारने केवळ घोषणा केल्या. या सर्व घोषणा फसव्या निघाल्या. केंद्राने देशातील नागरिकांना मोफत लस देणे अपेक्षित होते. पण त्यांनी लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकार आणि उद्योगपतींवर ढकलली.” असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button