शरद पवार, मनमोहन सिंग यांना कृषी धोरणावरून मोदींचे टोमणे आणि चिमटे

- भाषणातील १५ मुद्दे

PM Narendra Modi - Rajya Sabha

दिल्ली :- केंद्राच्या कृषी कायद्यांच्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून (Farmers Protest) विरोधक मोदी सरकारला (Modi Government) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषी कायद्यांबद्दल सरकारची भूमिका आक्रमकपणे मांडली. भाषणात त्यांनी माजी कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) याना त्यांचा बदललेल्या भूमिकांवरून टोमणे मारले.

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, डॉ. मनमोहनसिंग यांनी कृषी सुधारणांबाबत केलेल्या विधानांचा दाखला देत मोदींनी विरोधकांना टोमणे मारलेत. कर्जमाफीच्या मुद्द्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी विरोधकांना कृषी कायद्यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. बाजार समित्या सुरूच राहतील. हमीभावही कायम राहिल, अशी ग्वाही दिली.

पंतप्रधान मोदी म्हणालेत, अनेक आव्हाने आहेत. समस्येचा भाग व्हायचा की, समाधानाचा? हे आपल्याला ठरवावे लागेल. समस्येचा भाग बनलो तर राजकारण होईल. समाधानाचा भाग झालो तर राष्ट्राच्या धोरणाला पुढे नेऊ. समस्या आहेत, पण सोबत काम केलं तर निश्चित यश मिळवू.

ते म्हणालेत, सभागृहात शेतकरी आंदोलनाची भरपूर चर्चा झाली. जास्तीत जास्त वेळ आंदोलनासंदर्भातले मुद्दे मांडण्यात आले. पण, आंदोलन कोणत्या मुद्द्यासाठी आहे, यावर मात्र सगळे गप्प आहेत. आंदोलन कसे सुरू आहे. आंदोलनात काय सुरू आहे. यावर व मूळ मुद्द्यांवर चर्चा झाली असती तर चांगले झाले असते. कृषीमंत्र्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाहीत, याची मला खात्री आहे, असा टोमणा त्यांनी विरोधकांना मारला.

मोदी म्हणालेत, मी दैवेगोडा यांचा आभारी आहे. त्यांनी सरकारने केलेल्या कामाचे कौतुक केले. चांगल्या सूचनाही केल्यात. शेतीची मूळ समस्या काय आहे? याबद्दल माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी सांगितले होते की, बहुसंख्य शेतकर्यांडे जमिनीचे लहान – लहान तुकडे आहेत.

अल्पभूधारक शेतकऱ्यांची देशावर काही जबाबदारी नाही का? केंद्राने यांच्यासाठी खजी करायला नको का? चौधरी चरणसिंग आपल्यासाठी हे प्रश्न सोडून गेले आहेत. त्याचे उत्तर आपल्याला शोधावं लागेल. निवडणुका आल्या की कर्जमाफीची योजना राबवतो. ती शेतकऱ्यांची योजना आहे की, मते मिळवण्याची हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका मोदींनी कर्जमाफी मुद्द्यावर केली.

१० कोटी शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान योजने’चा फायदा झाला. बंगालचे राजकारण आड आले नसते, तर हा आकडा आणखी वाढला असता. छोट्या शेतकऱ्यांसाठी सरकारने पेन्शन योजना आणली. आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली. त्याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना झाला आहे,” असे मोदी यांनी सांगितले.

शरद पवार, काँग्रेसचे नेते आणि प्रत्येक सरकारने कृषी सुधाणांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. वकिली केली आहे. कुणीही मागे नाहीत. कारण शेतीच्या धोरणात सुधारणा व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटते. करू शकले नाहीत, ही गोष्ट वेगळी आहे. पण, या सुधारणा झाल्या पाहिजेत, असे प्रत्येकाने म्हटले आहे,” असे मोदी म्हणालेत.

शरद पवार तर आताही म्हणतात की, ते कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. अंमलबजावणीच्या पद्धतीवरून त्यांच्या मनात प्रश्न आहेत. पण, त्यांनी सुधारणांना विरोध केला नाही. या विषयावर सिंदियाजींनी खूप चांगली माहिती दिली. मागील दोन दशकांपासून यावर चर्चा सुरू आहे. प्रत्येकाला वाटत होते की सुधारणा व्हाव्यात. सुधनेची प्रक्रिया परिवर्तनशील असते. कृषी कायद्यात काही उणिवा असतील तर पुढे सुधारणा करू; हाच प्रगतीचा मार्ग असतो. अडथळे आणल्याने प्रगती होत नाही, असा टोमणा मोदींनी विरोधकांना मारला.

कृषी कायद्याबाबतच्या विरोधकांच्या भूमिकांवर मी थक्क झालो आहे, त्यांनी अचानक ‘यू टर्न घेतला’! असे का केले? विरोधकांना आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडायचे आहे. ठीक आहे. पण, शेतकऱ्यांना हे तर सांगा की, सुधारणा आवश्यक आहेत. नवीन गोष्टी स्वीकाराव्या लागतील. मला वाटते की राजकारण इतके वरचढ होऊन जाते की, स्वतःच्या विचारांचाही विसर पडतो! असे मोदी म्हणालेत.

डॉ. मनमोहन सिंग इथे उपस्थित आहेत ही चांगली गोष्ट आहे. जे यू टर्न घेत आहेत त्यांनी मनमोहनसिंग यांचे म्हणणे तरी लक्षात घ्यावे. – their are other rigidities because of the whole markets regime setup in the 1930’s which prevent our farmers from selling their produce where they get the higher rate of return. it is our intension to remove all those handicaps which come in the way of India, realizing its wast potential, at one large common market, हे आदरणीय मनमोहन सिंहानी सांगितले होते, आम्ही तेच करतो आहे. तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे की, मनमोहनसिंग यांनी जे सांगितले ते मोदी करता आहात. असा टोमणा मोदी यांनी मारला.

१९३० पासूनच्या कृषी मालविक्रीसंदर्भातील यंत्रणा नव्याने उभारण्याची गरज असून शेतकऱ्यांना त्याचा माल विकण्याचा अधिकार असला पाहिजे, असे मनमोहनसिंग म्हणाले होते. कृषी बाजारपेठा अधिक खुल्या करण्याची गरज मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती. कृषी बाजारपेठांना परावलंबी बनवणारी व्यवस्था बदलण्याचा आमचा उद्देश आहे, असेही मनमोहन सिंग म्हणाले होते, असा दाखला मोदींनी दिला.

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या काळात कुणी कृषी मंत्री व्हायला तयार नव्हते. सी. सुब्रमण्यम यांना शास्त्रीजींनी कृषी मंत्री केले. डावे त्यावेळेसही म्हणत होते, हे अमेरिकेचे एजंट आहेत. तरीही शास्त्रीजींनी सुधारणा केल्या. कृषी क्षेत्रात समस्या आहेत, हे मान्य करावेच लागेल, आता त्यावर उपाय शोधायची वेळ आहे. कुठल्याही कायद्यात सुधारणा करता येतात, असे मोदी म्हणाले.

सरकार कुठलेही असो, ते बदल करत असते. वाईट झालं तर माझ्या खात्यात, चांगले तर तुम्ही श्रेय घ्या. कुणाला तरी हे करावेच लागेल. मी हे करतो आहे. आंदोलन करणे हा तुमचा हक्क आहे, पण वृद्धांना घेऊन बसू नका. कधीही चर्चेला या, असे आवाहन मोदी यांनी शेतकऱ्यांना केले.

आपल्याला पुढे जायचे आहे. देशाला मागे नेऊ नका. सुधारणांसाठी संधी द्यायला हवी. चुका असतील, तर दुरुस्त करु. विश्वास ठेवा, बाजार समित्या, आडत अधिक सक्षम होतील. एमएसपी आहे. होता, आणि कायम राहील, अशी ग्वाही मोदींनी दिली.

ही बातमी पण वाचा : आधी पाठिंबा दिला, मग यू-टर्न का? कृषी कायद्यांवरून पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER